आशी इना म्हा से गोडी

आशी इना म्हा से गोडी


जुना सालले चालनी
उतरान मांगे सोडी
संगे लयी उनू म्हने
तियं गुयं नी व गोडी ॥धृ॥
गोडी तियं नी गुयं नी
ल्ह्यारे जबानले जोडी
वादा वादी आपसम्हा
द्यारे बठ्ठं मांगे सोडी॥१॥
गोडी ल्हेवा देवाम्हाच
खरी जीवननी गोडी
गोट हायीच सांगस
तियं गुयनी रे गोडी॥२॥
बोली मन्ही अहिरानी
तिन्ही आशीच से गोडी
माय भाऊ नी बहिन
बात बात म्हा से गोडी॥३॥
बोली नही आशी तशी
ल्ह्यारे दुनियाले जोडी
गोड दुनियाले करी
आशी इना म्हा से गोडी॥४॥


निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.

उतरान=संक्रांत, मांगे सोडी =मागे सोडून, लयी उनू=घेऊन आली, तिय गुयनी=तिळ गुळाची, ल्ह्यारे = घ्यारे, वादा वादी =वाद विवाद, ल्हेवा देवा म्हा=घेण्या देण्यात, गोट= गोष्ट बात, तिन्ही= तिची, करी=करेल.