आरे ऊठ खान्देश

आरे ऊठ खान्देश

आरे ऊठ खांदेशा, कवधुर लाई,बठसी भाऊ डोया..
ज्याना हातमा तु दिन्हा तराजू खाई ग्या तुपना गोया
कान्हाना तू पिकेल बोडा,तुल्हे कसानी रे भीती…
अख्खी दुन्याले आपीन सांगी जगानी रे नीती…
वाघ सिंहानं रंगत तुन्हाम्हा, हुई ग्या रे लांडगा..
ढूक जरासा तू तुन्हाम्हा, तुल्हे ईतिहास दांडगा…
आंबा खाये बोकड्या अन तू खुशाल मोजस कोया….1

राजबन्शी सांगे वारसा, तुन्ह लगीनम्हानरे गाण….
हुजऱ्यास्ले तू झाडस मुजरा, शे का तुल्हे भान….
तुन्हा रंगतनी रग मरी गयी, नाकले नही पानी…
रणछोडनी तू खरी औल्याद, थू तुन्ही जिंदगानी…
कुरुक्षेत्रम्हा लागेल डाग तू, आठेच तापीम्हा धोया…..2
कसं उमजाडू,कसं समजाडू, तू पडमथ्या भाऊ…
कीतला दिन तू असाच जगसी, ताटखाले म्याऊ…
लोकनी ईस्तरी फिराई फक्त टोपी करी चिकनी…
म्हणून आते हुबी ऱ्हायनी ह्या अहिरस्नी लिखनी..
म्हणे प्रकाश खोया खोसी आते फोड दादा पोया……3

कवी प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)