आम्हनी खुसुरफुसुर
लेखक:-नानाभाऊ माळी
भाऊ-बहिणीस्वन!
कालदिन रातले अथान कानी तथान कानी करी करी अंथरूनवर झावर पंघरी पडेल व्हतु!का कोन जाने जपचं लागे नई!तश्या इचार-वाचार भी डोकामां नाची नई ऱ्हायंतातं!भीतडावरनां झिरो बलब,रातनां अंधारालें आटखोया करी ऱ्हायंता!मीचंमीचं करी,
डोया फाडी फाडी वसरीलें उजाये दि ऱ्हायंता!मी त्यानंगंम दखु तो मनगंम दखे!येरायेरलें डोया तानी दखी ऱ्हायंतुतं!सासुले सासुले एक दुसरानी राखनदारी करी ऱ्हायंतुतं!तो झिरो बलब व्हता,मी जित्ता बलब व्हतु!दोन्ही नेम्मंन चमकी ऱ्हायंतातं!दोन्ही उजागरा करी ऱ्हायंतातं!रातन्हा अंधाराम्हा राखदारी करी ऱ्हायंतुतं
वर स्लॅबलें टांगेलं सिलिंग फॅन शेवटला बटनवर फिरी ऱ्हायंता!भवरांगत फिरी ऱ्हायंता!गुंगू करी फिरी ऱ्हायंता!मी आडा पडी पडी झिरो बलबनां आनी फॅनना खेय दखी ऱ्हायंतु!आर्धी रात व्हयी गयी थी तरी जपचं लागे नई! निस्ता डोयां तराठी जायेलं व्हतातं!मन्हा आंगे जपेल खटलालें सासुल लाग्ना व्हयी तशी आर्धी निंदम्हाच बोलनी!आंगवर खेकसायी बोलन,”मुगमुग पडतस नई!बिनकामनां आथा तथा हात पाय झटकी ऱ्हायनात!सोता जपानं नई नी दुसराले जपू देवो नई!टाईम बीमनं काय भान नई तुम्हलें!रात दखो नई,दिन दखो नई निस्ता नादीकनां मायेक खेय चालू ऱ्हास तुम्हनां!पडा आते!”
बाईनी दम दिधा!मन्हा आंग डोकावरथुन झावर व्हडी व्हाडी पंघरी दिन्ही आनी आंगेचं सोता डोया लायी पडनी!पंघरेलं झावरम्हायीन मन्हा आखो वट्राटपना सुरूच व्हता ,”जप नई यी ऱ्हायनी!काय करो बवा?….हायी झावर नव्वी दिखास बारका!कोनी से वं?” तवसिंग खटल सूर लायी बोलन,”मन मायनी जुनी साडीनी झावर शियेल से हायी!पडा आते! गन नरम चिटिंग सें!आर्धी रात व्हयी गयी नी आते बोल्या सूची ऱ्हायन्यात तुम्हले!” बाई खेकसाइस्नि बोलणी!
माहेरनां बठ्ठास्ले भारी अभिमान ऱ्हास बारका!माहेर जनम देत ऱ्हास!सासर जनम लेतं ऱ्हास!म्हणीसनी जवाई जम खाता ऱ्हास!..तरीभी मी मिचमीच्या झिरो बलबन्हा उजायामां!पंघरेलं झावरम्हायीन बोली ऱ्हायंतु ,” हायी झावर कांबळनांगत चुर चुरु लागी ऱ्हायनी? झावरमां कसलं पुरन टाकेल सें वं!”….
आर्धी-मर्धी रात व्हती!गह्यरी निंदनी रात व्हती!चिडीचूप रात व्हती!दुन्या गह्येरी निंदम्हा व्हती! घरमा एकाएक तुफान वांधी उनी! फफोटा भी उडाले लाग्ना व्हता!बयेल मिरचीनां खकानां बठ्ठा घरम्हा उठनां व्हता!अंधारी रात चमकायी उठनी!अंधारी रात भेमकायी उठनी!निशीतवार जपेल घर भी भेमकायी उठन!
बाई बोलनी ,”मनंमायनी साडी काटा व्हयी टोचाई ऱ्हायनी का तुम्हले? माले माहिती से,तुम्हले तुमन्हा मायना लुगडानी झावर पंघरालें लागस!नरम सुती ऱ्हास नां तुमन्हा मायनी साडी!इतलंचं वाटस व्हयी नां तुम्हलें, सक्कायम्हा कपडा दुकानाम्हा जावा!नवा लुगडा लयी या!मी त्या टरटर फाडी-फुडी तुम्हलें मुकल्या झावरिं शियीं टाकसु!काढा ती मन्हा माहेरनी झावर!”
तनफन करत बाईनी मन्हा आंगवरनी पंघरेल झावर भसकन व्हडी लिदी!
भीतडांवरन्हा झिरो बलब मीचमीच करी माले हासी ऱ्हायंता!वरन्हा सिलिंग फॅन गोलगिटिंग फिरी ऱ्हायंता!माले भी फिरायी ऱ्हायंता!त्यास्ले दखी मी मटरायी गयेतू!मिर्चीनां खकाना आजून जिमींनवर बसेल नई व्हता!बाईनी झावर मातर हिसकायी लिंथी!फॅनन्हा वार्गावर मी भी उडी ऱ्हायंतु!थुडूथुडू व्हयी ऱ्हायंतु!उबन्ही झावरलें काटा टोचाई ऱ्हायंतात!उबन्ही
गोधडीलें हिव वाजी ऱ्हायंत!मी मिटीमिटी स्लॅबगम दखी इचार करी ऱ्हायंतु ,
“जनमदेता माय बापलें सोडी पोरं नवरांगम येस!नवरानी वस वाढायी हायाती खपाडी देस!नवरानी थोडं तरी गुंमसुम व्हयी आयकालें नको?तिन्हा त्याग दखालें नको?”मंग गार जप लाग्नी माले!..उगता सूर्य चटका दि दनकारी ऱ्हायंता तव्हय जाग उंथी माले!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१७जून२०२२