अहिल्यादेवी होळकर कविता
धन्य तू अहिल्या माता
कर्तृत्वाची दिव्य गाथा
मंदिरे थकतील गाता
देशामाजी……1
तू जनतेची तारणहार
गमे आकाशातली घार
दीन दुबळ्यांचा कैवार
तुझ्या ठायी….2
निजदुःख घेतलं पाठी
देवधर्म अन देशासाठी
मारील्या पदरास गाठी
धन्य…धन्य… 3
केलं सत्तारोहन तू जरी
राज काजमध्ये ना दरी
झीजविली वाचा,वैखरी
लोकांप्रती…..4
जगवीला तपस्वी धर्म
करतली रुजविले कर्म
तव महानतेचं हे मर्म
थोर…थोर…. 5
सत्वाठायी दिलं महत्व
कर्तृत्वाला प्राप्त देवत्व
कुबेरासम तुझं दातृत्व
अन्य नाही…..6
लिहिता तुझे गुणगान
शब्दही झुकविती मान
होळकरी कीर्ती महान
पुण्यश्लोक…..7
कवी… प्रकाश जी पाटील.
(पिंगळवाडे)

धन्य तू अहिल्या माय
जशी तू कामधेनू गाय
देवबी धरेत तुन्हा पाय
मंदिरमा…….1
जसा लेकरेसना कैवार
लेस आभायमानी घार
तू व्हयकरी तारणहार
व्हती माय….2
घाव कपायना तू सोसा
पलो कंबरमा तू खोसा
देव नी धरमले तू पोसा
धन्य धन्य….3
धनी राजगादीनी जरी
माय दीनदुब्यानी खरी
पर्जा पखाखाले तू धरी
अहिल्याई….4
जगाडा तपस्वीना धर्म
ऊगाडं तू तयहाते कर्म
तुना मोठापणानं मर्म
देस देखे……5
सत्वासाठे मोजे तू मोल
तुनी करनीले सांगे ढोल
पुरी धरती फिरा रे गोल
तूच एक…..6
ईत्यास करस गुणगान
सब्दबी झुकाडस मान
तू मर्हाठ धर्मानी शान
पुण्यश्लोक…7