अहिरानी कवीता

अहिरानी कवीता

बेवडा

दिनभर उगामुगा
समकाळे बरळस केव्हढा
चमत्कार नही
हौऊ शे पेताड बेवडा

जीव पाह्या येव्हढा
उड्या मारस केव्हढा
रातभर गल्लीमा
दांगडो करस बेवडा

कामनं दुख याले
सकाळी स लागस दारू
म्हने पाव्हाले शे वरला
मनी चिंता नका करू

जगं नी नही लाज
पेयेल वर चढस माज
भेटना डोकावरला
मिटस मंग यानी खाज

दिसस भोळा भाबडा
चेहरावर नका जाऊ
उसना पैसा दिसन
आपले प्रेम नका दाऊ

भरेल घरनी
करतस दारुड्या व्हळी
रोज कज्या भानगडी
सोनासारखा सौसारनी राखरांगोळी

विवेक पाटील
मालेगाव (नाशिक)

एक व्हतं वांदर