अहिरानी अभंग संत सावता माळी

अहिरानी अभंग संत सावता माळी

संत सावता माळी भक्तीभाव अहिरानी अभंग

अरनगावना संत
भोया भक्त विठ्ठलना
ज्ञान कर्मना संगम
भक्तीभाव सावताना

अरे सावताना मया
वाटे काशी विश्वेश्वर
दखे विठ्ठल माऊली
भाव भक्तीनं वावर

ठायी ठायी भगवंत
कांदा मुया भाजीम्हा
कर्ममय सावतोबा
राबे सदा रे मयाम्हा

लिखे काशिबा गुरव
सावताना रे अभंग
काम करता करता
राहे भजनम्हा दंग

मोट नाडाना चालवर
चाले भजन कीर्तन
सावताना पांडुरंग
देई देहम्हा दर्शन
    
प्रा,अशोक दगाजी शिंदे
विसरवाडी जि.नंदुबार