अहिरानी अभंग पांडुरंग

अहिरानी अभंग पांडुरंग

  पांडुरंग

देव मन्हा भोया । सावया रंगना ।
निर्मय मनना । पांडुरंग..॥१॥

ईठूनी पंढोरी । तीरथ पौथिर ।
भेटाले आधिर । वारकरी..॥२॥

ईठ्ठल मंदिर । काठवर जठे ।
नदीमाय तठे । चंद्रभागा..॥३ ॥

आषाढ वारीमा । राम क्रिश्न हरी ।
गास मन भरी । भक्तगन..॥४ ॥

मननी सोज्वय । मयानं कोठार ।
हुभी शे शेजार । रखुमाई..॥५॥

बाप ईठूराया । मन भरीसन ।
घडू दे दर्सन । सालोसाल..॥६॥

पायशे ईठोबा । तुन्हा मी नमस ।
अभंग आर्पस । देवदत्ता..॥७॥

अभंगकार-देवदत्त बोरसे
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५