अहिराणी लेख विशेष धुईधानी

अहिराणी लेख विशेष धुईधानी

कोठे भी लगीनयावं ऱ्हावो!मरन धरन ऱ्हावो!आपले जानचं पडस!नातं-गोतं समायन पडस!मित्र समायना पडतंस! गल्ली-गाव समायन पडस!गावकी समायनी पडस!आपुन जासूत-इसूतं तें आपला दारसे लोके पाय ठेवतीन?पिढी जात फाईन चालत येलं हावू रीवाज सें!मानोस मानोसनां संगे बोली तें त्याले बोलनं चालनं म्हंतंस!जावा येवानां माव्हरा ऱ्हायना तें मानूस मानोसले वयखतं ऱ्हास!व्हयख पायेख ऱ्हायनी का मानोस तठे जायी भिडस!

गंजजं सावा कायक्रमलें जावानां मोका भेटत ऱ्हास!तठे टायता येतं नई!सोडता येतं नई!डोया झाकी पाय काढता येतसं नई!त्यास्मा हिरनं – फिरनं-मिरनं पडस!गावकी निभावनी पडस!निभावता-निभावता आपुन त्यास्ना व्हयी जातंस!आपलं जगनं त्यास्न व्हयी जास!जीव भावनां मानसे आपली दुन्या व्हयी जास!तठे जेवणे व्हतस!जेवणार-वाढनारंनां गोह्यमांम्हा आपुलकी-पेरेम ऱ्हास!आग्रोह व्हस!त्यास्मा नेम्मन सज बठत नई!वाढणारा हात मोक्या सोडी व्हाडतं ऱ्हास!पत्तरवायाम्हा वाढालें जागा ऱ्हात नई!जेवणारनं पोट भरेल ऱ्हास!डेंडारन्या गयांखालें कितलं उतरी बरं?

वाढनारनां जीव भावनां अग्रोह ऱ्हास!जेवनारनां गये उतरतं नई!पत्तरवायें-ताट भरेलंनां भरेलं ऱ्हास!भरेलं ताट आपलागंम दखत ऱ्हास!कोनंले दोस देवानं?तितलाम्हा पंगेत उठी जास!भरेलं पत्तरवाये काय म्हणसं व्हयी?पत्तरवाया उचलणारा भर भर येतंस!तगाऱ्यास्मा,टोपलास्मा बठ्ठ उष्ट भरी गावना भाहेर फेकी देतंस!तठे पोट भरनारा बिचारा अन्नानी काकूंयदी वाला आन्न आपला
भांडास्मा गोया करतस!ऱ्हायेलं तठे तेच आन्न डुकरे खातस!मोक्या सोडेल ढोरे खातस!हाड्या, चिड्या, मुंग्या खातसं!ऱ्हायेलं-सुयेलं सडी जास!वास मारालें लागी जास!अन्नानी नासाडी व्हस!आसी धुईधानीलें काय म्हनो?

नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ डिसेंबर २०२३

3 thoughts on “अहिराणी लेख विशेष धुईधानी”

Comments are closed.