अहिराणी लेख वाझोंटी
दि.१२/१/२०२४
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मायबापनी एककुलती एक आंडेर लाडप्यारथीन वाढे लागेल व्हती.मथुरा नाव हायी खरंच तिले शोभे देखा दावामा रूपवान सुंदर,गोरी,गोमटी जशी दिखे ती अफ्सरा सारखी,शाळामा खुप,हुशार एक नंबर गल्ली आलीमा भी तिनं खुप कौतिक करेत.आंडेर जशी मोठी व्हत गयी तशी मायबापले तिनी चिंता सतावाले लागनी. सोळा सतराना घरमा जाताच मायबाप म्हणेत पोर आपली उपर व्हयी गयी.आते आपले पोरना साठे सगायी समंध देखना चालू करी देऊत देखा देखामा चांगल जबुनमा दोन वरीस कथा निंघी गयात ध्यानमा उना नहीत.आयी गाव ते गाव फिरामा निंघी गयात.उन्हं मंग असामा एक पहिलंच मांगनं , मायबाप म्हणेत पहिलं मांगनं आणि फुल सुगनं हायी जुनी म्हण त्यासनी आयकेल व्हती.पोरना,मामा,आजी, आजोबा,यासले सांगीसन सबंध पक्का कया.पोरले पोरगा पसंद झाया,पोरगाले,पोरगी पसंद झायी.आणि मंग बस्ता फाडीसन तारीख पक्की झायी.में महीनानी ७ में ले लगीन तारीख ठरनी.दिन मांगे दिन जायेत.उनी हायी लगीननी तारीख जोडे मंग धुमधडाकामा,बॅंडवाजा,कंडोलनी वऱ्हाडी मंडई सर्वी तयारी पूरी करीसन धुममा लगीन पार पडनं. बिदाई करीसन पोरगी सासरे गयी आणि मंग मायबापना डोयाले दोन दोन धारा लागेत.पोर आपली लाड प्यारथीन वाढे लायेल व्हती. कसानी तिले कमी नही व्हती. पोरगी सासरे जाई म्हणीसन उभा वारा सुटे मायबापले. पोरगी मस्त नांदाले लागनी सासरले.असामा दिनमांगे दिन जायेत. एक एक दिन करत करत वरीस बारा महिना लोटाई गयात ध्यानमा उना नहीत. मस्त हाशी खुशीमा संसार पोरना चालू व्हता.
असामाच एक दिन अचानक शेजारीनबाई पोरना सासरले पोरना घर वटा चढी उनी सासुना जोडे गप्पा मारता मारता बागीच करीसन सांगाले लागनी काव्हं ताई तुले एक गोट विचारू का? तुले राग बीग नही येवाना. तुना व्हऊना बरोबर इतर दुसऱ्या बाया भी सेत . त्यासले दिवस सेत आणि तुनी व्हऊले काहीच नही. असं शेजारीन बाई सांगीसन मिटना खडा टाकीसन चालनी गयी.मंग सासुना डोकामा खटका पडना. सकुमायनी जे सांग ते भी खरंच से आते काय करानं में पोरे सोरे व्हवाना हायी काही आपलं हातमा नही. पण आपुरा डोकानी व्हती सासू तव्हय पायीन लाई दिन मंग घरमा तन्ह पन्ह करनं, त्रास देनं चालू करी दिनं आंडोरना कान भरे जोडेना पोरेसनं तुना बराबरच लगीन व्हयेल सेत. त्यासले लेकरू बाय व्हयी गयांत तुनी बायीले काहीच व्हतं नही. आंडोरले एकना दोन भराये सासू ,तसातसा तो भी मायनं आयकीसन पानीमा देखे आणि मारठोक गाया शिया दिये.पोर तशीच सयीन करे भगत भगताई दवाखाना करीसन भी टाया बसे नही. तिबाक देखो धल्ला मायबाप कोनले सांगनं काय करवा काहीच सुचे नही.घरमा चित लागे नही. रोजच कटकट व्हये खावाले नही आणि पेवाले चित लागे नही. असा असामा चार वरीस निघीं गयात. नवरा दररोज मारजोड करे सासू तिले वाझोंटी,वाझोंटी,निपुत्रीक अवधसा म्हणे, वाटेल ते व्हऊले म्हणत जाये. बायीनी जात कितलं सहन करी. एक दिन तिनी मनमा विचार करा. मायबापले सांग ते त्या हायी सहन करावं नहीत. सासू व नवराले यानं काहीच फरक पडावं नही.
आपलं या घरमा राहीसन काहीच उपयोग नही.आते आपला जीव हाऊ ठेवना नही. असं ती ठाम मत करसं जिवन आपलं संपावाना पक्का ठरावस.एक दिन ती गयफास लेवानं करस अचानक तिले आवाज येस बेटा तू हायी काय करी रहायनी ती सांगास माता माले जीव हाऊ ठेवाना नही. हाऊ जीव ठिसन मी काय करू, मन्हं पोट पानी पिकत नही. माले पोरसोर व्हतं नही. घरमा सुख समाधान नही. घरमा सासू नवरा त्रास देतस,सर्वा माले वांझोटी, वांझोटी निपुत्रीक म्हणतस.सांगना माता मी कशी राहू , कशी काय जगवू,तूच सांगना माता माले उपाय मी काय करानं आते कसं जगानं. थांब पोरी तू येवढा कठोर निर्णय लेवू नको मी तुले उपाय सांगस त्या तू कर लक्ष्मी माताना तू उपास कर आणि मंग देख तूना वरनं जे संकट से आपोआप कस दूर व्हयी जाई आणि तुनी सासू नवरा या सुद्धा तुना आदरभाव करतीन. तुले पोरसोर भी व्हयी जाई येवढच मी सांगस तथास्तू तरी असो
वांझोटी म्हणीसन कोनी आपली टिंगल टवाळी करी त्याना मांगे लागू नका एक दिन दगडले भी देव पावस तरी असा वाईट विचार मनमा आणू नका येवढीच मनी हात जोडीसन विनंती से तुम्हले.
कवी.दिलीप हिरामण पाटील
कापडणे ता जि धुळे
मो.नं.९६७३३८९८७३