अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु
(हाऊ लेख मी १९९८-९९ म्हा गावकरीम्हा आप्पान्या गप्पा सदरम्हा लिखा व्हता. तोच लेख मी दादादास्ले भावभिनी स्रदांजली म्हनीन मन्हा प्रोफाईलवर टाकेल से.
कायी माटीन लाडक लेकरु
ना.धो. महानोर
कायी माटीन लाडकं लेकरु। लोकसंगीतनं ठसकेबाज वासरु।
खान्देस व-हाडनं उडतं पाखरु।
मराठी भास्यानं दिमाखदार कोकरु।
आसं ज्यास्ले म्हनता यी त्या महानोर दादानी वयख आज करानी से.पंढरपुरनी माऊलीना भगत संत नामदेव इठू भक्तीना अभंग लिखामुये भारतम्हा नावाजनात तं पयासखेडना नामदेव कायी माटीनी म्हंजे कुणबीस्नी माऊलीनी भकतीमुये गाजी राह्यना. ना.धो.महानोर हायी नावं आयकीसन व्हतू,त्यासन्या कविताबी वाचेल व्हत्यात. आपुन जी माटीम्हा जनमतस,जी माटीम्हा वाढतस,ज्या वातावरनम्हा राहतस. तठेनाज दाखला दिसनं सजाडेल कविता वाचाले भेटनी म्हंजे ती कायिजले जायी भिडस,आपली वाटस आगयीयेगयी वाटस. आपल वावर,त्याम्हाना पिके,त्यास्ना रंग,वास,पाऊसपानी,पाखरे,आभाय नी खान्देसी आहिरानी व-हाडी सब्देस्नी सजावट महानोरेस्नी कविताम्हाज दखाले भेटस. त्याले आनखी जोड देयेल से लोकवहीस्नी- लोकसंगीतनी. त्यामुये त्यासनी कविता आयकाले आमरीतथाईन बी गोड वाटस. आसा हाऊ खेतीमायना सपुत माले मातर दखाले आयकाले भेटेल नै व्हता. मन्हा आहिरानी भास्याना पिरेममुये यकदाव आयती संधी चली उनी. मुडी- मांडयले आहिरानी भास्याना पह्यला मेया भरना व्हता. त्या मेयाले मी आहिरानीना पिरेममुये तसज “गावकरी” ना वतीखाल जायेल व्हतू. तठे माले महानोर डोयाभरी दखाले पोटभरी आयकाले भेटनात.
मांडयना मेयानं संमेलननं उदघाटनं महानोर दादानी कयं. गडी दखाले गोरापान- उच्चापूरा-राजबिंडा से. मिठ्ठूना मायक बोलस भी भलत मिठ्ठास. भाऊले इबागना लोकेसनी आहिरानी भास्यानी चांगलीज माहिती दखायनी. ” मायबोलीना इकासना गुनता खानदेसी लोकेस्नी हातपाय हालावाले पाह्यजेत. जयगावं इद्दापिठनी आहिरानी आध्यासन सुरु कराले पाह्यजे. आसा धाकला धाकला बोली भास्यास्ना मेयावाजमुये मराठीना भी इकास व्हयी.” आपला मनले भिनी जायी आसं गच्ची गच्ची बोलना भो. माले त्यास्ना मायक पटाडीसन सांगता येवाव नै. त्यास्नी सर का आपले येवाव से ? आसा महानोर दादाले आते समधा मराठी मुलुख वयखस. कवी-कथाकार-कादंबरीकार-गीतकार-आमदार-शेतकरी आसा नाना त-हेना सोंगे त्या वठाडतस. मातर तो भाऊ खेतीमायना आस्सल पुजारी से,हाडना सेतकरी से. पयसखेडना उजाड मायरानम्हा त्यास्नी फयेसन्या बागा फुलाडेल सेतीस.
ना.धो. महानोर हायी नावज भारदस्त से त्यास्न कामबी भारदस्त से. महानोर दादाना जनम पयसखेडाले १६ सप्टेंबर १९४२ ले सेतकरीना घरम्हा व्हयना. त्यासना बापदादा पंढरीना इठोबानी भक्ती करेत. घरम्हा अभंग, ओव्या,भारुड,गवळनी, गाना आयकत आयकत महानोरनं बायपनं गय. सायना बुकेसम्हान्या कविता मोठायीन मोठायीन वाचिसन पाठ करीसन म्हनाना त्यासले नाद व्हथा. त्यास्ले पुस्तके वाचानीबी भलती गोडी व्हती. मव्हरे महानोर दादानी सोता कविता लिखाले सुरवात कयी . १९६७ सालम्हा पाप्युलर परकासननी दादाना “रानातल्या कविता” हाऊ वयास्ना संग्रोह छापी काढा नी यक आगया येगया दमदार, कसदार कविनी जगले वयख झायी. मंडयी मंग हाऊ गडी कोठे थांबनाज नै. रानातल्या कविता, वही,अजिंठा, पावसाळी कविता आसा यकथाईन यक सरस कवितास्ना बुके लिखात. गांधारी नावनी कांदबरी लिखी. शेतकरी दिंडी,शेतीसाठी पानी, सिताफय बागनी गोठ आसा गच्ची पुस्तके लिखात. महानोर भाऊनी दमदार लेखनीमुये ,सेतीमायनी सेवामुये त्यास्ले गनजज पुरस्कारभी भेटनात. क्रुषिभुषण, वनश्री, पद्मश्री, क्रुषिरत्न आसा त्या पुरस्कारेस्ना नावे बी माले सांगता येवाव नैत. आते आते त्यास्ले कुसुमाग्रज प्रतिष्टानना “जनस्थान” हाऊ मोठा मानना पुरसकार भेटना. ते आयकीसन माले तं आभाय दोनज बोटे राह्यनं भो. पुरस्कारेस्नी हायी खिरापत दखीसन माले यक उरदू कविना सेरनी याद उनी. ” खुदीको कर बुलंद इतना की, हर तदबिरसे पहले खुदा बंदेसे खुद पुछे, बता तेरी रजा क्या है ? म्हंजे तुमी जे काम करस्यात ते इतल जीव वतीसन करा, मन लायीसन करा की समधा गड जिकीसन आभायनी उच्चीवर जायी बसा. त्या कामना म्होरक्यानी तुमले सोताव्हयी इचाराले जोयजे, ” बोल तुले कोनती बक्षिसी देऊ?” महानोर दादानी जे देख जे आयक जे भोग ते लिखी टाक. खयाम्हा, मयाम्हा,वावर सिवरम्हा, पिके फयेफुये ढोरेपोरे पाखरे यास्नाम्हा महानोर रमनात. खेडापाडान्या बायाबापडीस्ना आखाजी दिवायीना गाना, लगीनना गाना, घट्यावरला गाना त्यासनी आयकात, मनम्हा कायिजम्हा साठाडी ठेवात. ये उनी तव्हय कायिजम्हाईन उपसी काढीसनी पेनवरी कागदवर उतारी काढात. कायी माटीसी, खेतीमायसी त्या यकरुप व्हयी गयात. यक कविताम्हा त्या म्हनतस,
” ह्या शेताने लळा लावला असां की
सुख दुख:ला परस्परांशी हसलो-रडलो
आता तरी हा जीवच अवघा असा जखडला
मी त्यांच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ”
त्यामुयेज त्यासले काही लोके निसर्गकवी म्हनतस. महानोर दादा मननाबी भारी हयवा सेतस. अजिंठाना पायथाले घडेल गील – पारुनी कथा आयकीसन त्यासना हूंदका दाटी उना. तो हुंडूक त्यासनी अजिंठा काव्यसंग्रोहम्हा चितारी काढा. पारु साथसंगत सोडीसन देवघर चालनी गयी, तव्हय गील सायेबले जे दुक व्हयनं ते हूबेहूब चितारेल से… ” शब्दात गाठले दु:ख शब्द अलवार। ग्रासली उन्हे झाडांना हिरवा भार । काळीज कुरतडे खोल मुका आकान्त । घनघोर मनाच्या तळ्यात चंद्र विखार । हा अथांग दरिया दु:खाची बारात । आयुष्य उधळले लक्तरलेले हात ।
ह्या सब्दे मनना ठाव ल्हेतस , कायिजना थरकाप उडावतस, शेक्सपिअर आख्खा नाटकम्हा जे सांगे ते
महानोरेस्नी ते निव्वय सहा वयीजम्हा उभं कयं. यक यक सबुद लाखलाख मोलना से. महानोर कवी नै महाकवी से.
हिमालयनी उच्चीना, संमीदरनी खोलीना, कायी माटीना दयना, कायी माटीम्हाईनज उगेल,वाढेल, कायीमाटीनाज गाना लिखनार कवी- लेखक हजार वरिस पह्यलेंग बी व्हयना नै नी हजार वरिस मव्हरेबी व्हवाव नै. आसा महानोर दादाले मन्हा हाऊ मानपानना आहेर. राम राम मंडयी राम राम.
रमेश बोरसे
1 thought on “अहिराणी लेख कायी माटीन लाडक लेकरु”
Comments are closed.