जल जठे जीव तठे अहिराणी मायबोली कवीता

अहिराणी मायबोली कवीता

जल जठे जीव तठे

अरे ओ शहरी बाबू
पानी वापर नेम्बन
वाया नको घालू पानी
येडा शाळा शिकीसन..!

गुंडाभर पानीकर्ता
गांव सम्द भटकस
शिरीमंती तुन्हा दारे
तरी तू पानी वतस..!

आंग आश्या धोस भाऊ
मन भरस तोवर
तासभर तरी तुन्हा
चालू ठेवस शॉवर..!

मन्हा गांवले ये कधी
मंग समजी दुष्काळ
वल्ला आम्हना डोळात
दिशी कोयडा जंजाळ..!

राग नको मानू दादा
कर्तृतनी वाट धर
पानी भरीस्नी तेवढा
नळ फक्त बंद कर..!

झाडे झुडपे लायीस्नी
आम्ही पानीले वाचाडं
धरनना पोटम्हायी
तुन्हा घरमा पौचाडं..!

नदी,नाला आटनात
पानी कोठुन आनुत
तांब्या धरीस्नी हातात
कथाकथा भवडुत..!

तूच ईचार मनले
पानी कुठे बनस का ?
जल जठे जीव तठे
सुत्र हायी कळस का ?

बाथटब,स्विमिंग पुल
चाळा तुन्हा सम्दा टाळ
जित्त र्हानं शे तुले ते
पानी तेवढं सम्हाळ..!

कवी-देवदत्त बोरसे
           (सुगंधानुज)
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.