अहिराणी मायबोली कवीता
सासर-माहेरन कौतक
सासू मन्ही जी यसोदा
माय मन्ही व देवकी,
दोन्ही मियीस बनाये
आशी माले व नेमकी.
माय मन्ही व पांझरा
सासू मन्ही जी गिरना,
वारा दुखना जरा ना
मन्हा भवते फरना.
माय मन्ही व येकोरा
सासू मन्ही सत्तशंगी,
सदा चांगला कामनी
इचारनी ऱ्हास गुंगी.
माय मन्ही दुध तूप
सासू दराखानी येल,
मन्हा आंगवर सदा
माय ममतानी शेल.
सासू मन्ही जी दुरगा
माय मन्ही बने काशी,
दोन्ही घर माय मन्हा
माले सोडेना जराशी.
आसा कसा रे देवबा
सरे सासर माहेर,
सुन सुनकार पडे
माय मन्हा लेवकार.
काशीकन्या जालना
पांझराना नदी थडे काव्यसंग्रह