अहिराणी गोष्ट डुकरनं वाघले आव्हान

अहिराणी गोष्ट डुकरनं वाघले आव्हान

डुकरंसले कायम गंधा म्हणतस. पण जुना काळमा त्या तसा नव्हतात. जंगलमधला बाकीना प्राणीसनामायक त्या बी स्वच्छ राहेत. या डुकरं गंधा कसा व्हयनात त्यानी एक मजेदार गोष्ट शे. मेघालयना जंगलमा सर्वा जनावरं खेळीमेळीमा राही राहींतात. जंगलमा सर्वासले भरपुर खावाले-पेवाले बरच व्हतं. एक दिन एक वाघ शिकार कराले निंघना.अहिराणी कथा

त्याले पोटभर शिकार खावाले भेटनात. जीभ चाटत तो पाणीना शोधमा निंघना. इकडे-तिकडे फिरावर त्याले एक धाकला तलाव दखायना. तो काठवर पाणी पेवाकरता गया. त्याच येळले एक डुकरनं पिल्लु चिखलमा बराच येळपाईन खेळी राहित. अनी समोरना बाजुले ते बी पाणीमा घुशीन पाणी पेवाले लागनं. त्यानी जवय वाघले दखं, तवय भ्याई गयं. त्याले पळी जावानं अनी स्वतःले वाचाडनं शकच नव्हतं.

ईकडे वाघले इतली तहान लागनी व्हती कि, ते पिल्लु त्याले दखायनच नही. वाघ पाणी पेवाले खाल वाकना, अनी पटकन मांगे फिरना. पाणी भलतच गढुळ व्हतं अनी त्याले गंधापटक वास ई राहींता. त्या पिल्लाना आंगवरला चिख्खल पाणीमा मिसळी जायेल व्हता. वास तर इतला ई राहींता कि, ते पाणी सोडीन वाघ दुसरीकडे पाणी शोधाले निंघना.

वाघनी हाई माघार दखीन ते पिल्लु पहिले गोंधळी गय. पण ते जरा धीट व्हतं त्यामुये त्याले वाटनं कि, वाघ मालेच घाबरना! नहीतर तो इतला घाईमा परत कसा जाई?

animals 35960 640633260175295193125
डुकरंसले कायम गंधा म्हणतस पण जुना काळमा त्या तसा नव्हतात

त्या धाकला डुकरले आपण हत्तीनामायक शक्तीमान शेतस अस वाटनं. ते वाघनामांगे पळाले लागनं. त्यानी वाघले सांगं, “वाघोबा दादा, परत ईसन मनासंगे दोनहात करा; डरफुक कथाना पळी जाऊ नको!”

वाघले भलतीच तहान लागेल व्हती. त्याले आत्ते काय भांडानी ईच्छा नव्हती. नुसती मान मांगे वळाईन तो घुरघुरना, “मी आज तुनासंगे लढावं नही.” याच येळले तु सकाळ आठे ये अनी मंग आपला सामना व्हई.” पण पिल्लाले अस वाटनं कि वाघ घाबरी गया म्हणीन तो नाटके करी राहीना! डुकरले आखो रव चडना अन तो गर्वतीन फुगी गया.

पयतच घर जाईन त्यानी सर्वासले सांगत सुटना कि, “वाघोबा माले घाबरस, म्हणजे आते तर मी जंगलना राजा व्हसु!” घरमधला सर्व डुकरसले बलाईन त्यानी जे व्हयनं ते जसनातस सांगं. त्या ऐकीसन थक्क व्हयनात. वाघनी तलावमधलं पाणी का बरं प्यायना नही अन तो तठेन का बरं निंघी गया व्हई, त्यानं कारण त्यासनी लगेच वळखं. त्या पिल्लाले असा आगावपणा कराबद्दल सर्वाजन त्यानावर संतापणात. वाघले आव्हान दिसन आपण कितली मोठी चुक करी हाई डुकरले समजनं आते तर त्यानी बोबडीच वळनी. दुसरा दिन वाघना जेवनकरता आपला बळी ठरेल शे अस त्याले वाटनं. नातुनी हाई केवलवानी अवस्था दखीन त्याना आजोबाले वाईट वाटनं. त्यासनी एक योजना बनाडीन त्याले सांगी.

आजोबानी सांगेलप्रमाणे ते डुकर घाणमा लोळनं, अनी चिख्खल, हत्तीनं शेण, गुरेढोरसना कचरा, जंगलमधला गंधी जागावर तो लोळीसन तो गंधा वास लिसन ते डुकर वाघले भेटाले गया. इकडे वाघ त्यानी वाट दखी राहींता. त्यानी ठरायेलच व्हतं कि, लढाई संपनी म्हणजे मी याले खाईच टाकसु.

जवय ते डुकर त्या वाघले भेटनं तवय वाघले त्याना भलताच गंधा वास वना, तो बोलना, “अरे कितला गंधा वास ई राहीना तुना!” डुकर बोलनं, “मना आजोबानी शिकाडं कि शेण कस फेकानं, ते करी दखी राहींतु” अस बोलीन ते थोडं पुढे सरकनं. वाघले तो वास सहन व्हयना नही, त्याले मळमळ सुटनी तो बोलना, “अरे निंघ आठेन! मनासमोर थांबु नको!” तो संतापमा गुरगुरना. ते डुकर नाराजीनं नाटक करीन बोलनं, “अनी आपला लढाईनं काय?” Ahirani Story

“गप बठ! माले तुनासंगे लढाई करनी नही शे” वाघ तोंड फिराईन बोलना. कारण त्याले वास सहन व्हई नही राहींता. डुकरनं पिल्लु तर आनंदमा घर वनं. त्याना घरनासले बी आनंद व्हयना. त्याना घरनासले समजन कि, घाणमुयेच तो वाचना. त्या दिनपाईन घरबाहेर पडनात कि सर्वा डुकरे पहिले घाणमा लोळाले लागनात. आज बी त्या तसच करतस.

logo11 30 720585772565676177736482
अहिराणी गोष्ट डुकरनं वाघले आव्हान