अहिराणी कवीता नातगोत

अहिराणी कवीता नातगोत

माहेरन गोत
तोरण दारले
सासरन गोत
सुतक घरले

सालाना पोर
शिकाले घर
भाऊना पोर
बोर्डींग वर

माय बाप
आनंद चेहरावर
सासु सासरा
भांड भांडावर

सालीन लगीन
मोठा आहेर
बहीन लगीन
सस्तान कुलर

सालीना लाड
नव लुगड
बहीण भाची
व्हस जड

घर मायबाप
वाट दखतस
सुट्या लागताच
सासुरवाडी पळतस

पोळाना बैल
गाव फिरतस
घराना नंदी
माना डोलतस

विवेक पाटील
मालेगाव(नाशिक)

अहिराणी कवीता

खान्देशी विविध बोली साहित्यिक लेखपट