” बारासनी माय .. ? ” अहिराणी कथा
” अय ss ‘ हाडवायसहोन कथा ढुकी राहयनात रे त्या हेरमा ? बये ‘ जाशात ना रे बारा ना भावमा ‘ हेरमा पडनात मंग ‘ उपादच शे ना ‘ कारे वं शेंपा ss ‘ तुले बी काई काम दखात नई मन ध्यान . ” तवसामा शेपा बोलना . ” का बरं काय झाये ? ” … ” अरे ‘ या हाडवायसले काबरं आनं ? दखात नई का तुले ? त्या आठे कीडा पाडी राह्यनात ते ? बये ‘ त्या हेरमा ढुकी राह्यनात ‘ अन् मंग कदी तोल बिल गया ते मंग उपादच शे ना हाई ? कसाले आनत बसना त्यासले ? ” तवसामा शेंपा म्हने .. ” अरे दादा ‘ मी गाड् जुपी राह्यंतु तवसामा हाई हाडवाई जमा व्हई ग्ये . आनी न्हानमाय म्हने “जाऊ दे भो लई जा यासले . आठे बी कानी त्या भलता वन् वन् करतस त्या.आते तूच सांग न्हानमायनी सांगावर मी काय करू तठे .. ?
” पन आथा दखस का तु ‘ एक ते त्या हेरले कठड् नई ‘.जिभोसले कदी पाशीन सांगी राहयनु ” जिभो हेरले कठड बांधी ल्या हो ss ” कठड् बांधी ल्या . पन जीभो ध्यान दी तवय ना ! चालढकल करतस त्या ‘ मायन्यान कदी भो ss “तर मंडई ‘ वावरमा बारा धराना कामे चालु व्हतात . रोजंदारीन्या बाया बी हेरना आंगे कामे करी राहयंतात . शेंपा आनी दुसरा सालदार दोनी जनी वावरमा कामे करी राह्यंतात . मज चार – पाच परतन जीमीन व्हती जिभोसनी . जिभो मोठा ‘ कर्ता पुरुष त्या घरमा शेंपा जिभोना पाठना पाच भाऊसनी जोड. पाच पांडवसनीच जोड व्हती असच म्हना ना.
तर मंडई ‘ असा मस्त ‘ हशी खुशी खाल दिन चालना व्हतात . पाची भाऊसले एकच बहीन व्हती . तिनं मांगनाच वरीसले लगीन झाये . सहेरमा दिनी व्हती . धूम खाल लगीन कये व्हतं . न्हानमायना चांगलं ध्यान मा व्हतं . पाची भाऊसना वडिल जात राहयना व्हता . तवय पासुन आख्ख खेतीनं काम देखरेख त्याच करेत . बैले ‘ म्हशी ‘ ढोरे ढाकरे ‘ आख्खा गावना भाहिर खयामा राहेत . दोन बैल जोड्या ‘ टॅक्टर ‘ मोठ्ठा पसारा ‘ व्हता जिभोसना जिभोच वावरेस कडे दखेत . पाची भाऊसना लग्ने व्हई जायेल व्हतात . पोरे सोरे मस्त हसतं घर व्हतं काय दखनं तठे ? बोरीसना दिनमा बोरी ‘ आंबासना दिनमा आंबा ‘ जामेसना ‘ झाडे व्हतात . बागाईत पन चांगली व्हती . पाची भाऊसनी जोड ‘ वाडवडिलेसनी पुन्न्याई ‘ म्हना जीमीन मस्त आनन मा कस्सी राहयंतात त्या . न्हानमाय वट वट करत राहे . वट्टाना कोर वर बशी राहे . पार मांगनं पुढनं दार व्हतं . चांगलं सात येलीसनं घर व्हतं . सरा बीरा सागवानी लाकुडना व्हतात . दरवाजा की सागवानी लाकुडनाच व्हतात . कडी पाटनं ‘ वाडवडिलसनं घर व्हतं . घर नवं बांधूत आते सिमेंट कांक्रीटिना जमाना ऊना पन घर इतलं मजबुत व्हतं जशी पाची भाऊसनी जोड व्हती . तस्संच दमदार घर व्हतं . जिभो म्हंजी कटायखोर मानुस व्हता . कंजुष व्हता . म्हनीसन त्याले लोके चिडायेत आनी म्हनेत ” कारे जिभो ss तुमनं बठ्ठ डबोलं सम्हाईसन बसना बये काडी लाई ते पाच दिन शिलगाव नई रे . धाकल्ला शेतकरीसनी सिमेंट मा घरे बांधात आनी तुमीन रे ?
पन काय शे मंडई जिभो म्हंजी एकदम दूरना इचार करनारा मानुस व्हता . त्याना धोतरे बी बये जाडा भरडा राहेत . दर वरीसले नवं वावर लेवा मुचुक राहे नईत . काटकसरी व्हता . टॅक्टर जरी व्हतं तरी लोखंड्या ‘ जुना लाकडे सना औते ‘ वखरे ‘ जिभोनी सम्हाई ठेल व्हतात . असा जिभो व्हता . आनी त्याना चारी भाऊ मातर त्यानं ऐकीसन व्हतात . त्याना भाहिर नई व्हतात . जिभोना मव्हरे कोनच काई चाले नई ‘ पन जूग दखीसन गावमा सालमा दिवाईले कदी गावना बारी कदी ऊना ते म्हना शिवाय नई राहे ” भाऊ बंदकी जोडी सदा कायम रख्खे ” . तशी खेडा गावसम्हान म्हनानी पद्धत व्हती .
न्हान माय आते थकी गयथी वट्टाना कोर धरीसन नातेरसले खेवाडे सुना बी ऐकीसन व्हत्यात . नऊवारी लुगडा ‘ नाकमा नथ ‘ कल्ला तोडा ‘ जुना पद्धत खाल राहनार्या सुना भेटन्या व्हत्यात . सन म्हना ‘ लगीन यावम्हान सोनाना दागिना ‘ वज्जटी ‘ बीज्जटी ‘ घालीसन लगीनना काठ पदरना शालु घालीसन मिरायेत . पन नवं काई नवा काठ पदरना लुगडा लिनात असं नाव नका बोलू . तुमीन जिभोना मव्हरे कोनी हायसत नई व्हती . जिभोना परवानगी शिवाय वावरनं काय नी घरनं काय पान बी नई हाले . त्या सुनासना माहेरी लगने यावमा जावानी ये जर ऊनी ते ज्या सीजनमा आंबा ‘ नई ते जे काई पिकत व्हई ‘ घास म्हना ‘ कोथमेर म्हना ‘ मेथी न्या जुड्या नवरा बायकोसनी लई येवा आनी नवराले मार्कीट म्हान धाडीसन ज्या पैसा ईथीन त्या लगीन म्हान आहेर वाजाडाना अशी रित त्यासनी घरमा पाडी लिनी व्हती . मोठा डखारा व्हता पन जिभोना मव्हरे कोतांच भाऊनं ना कोंताच व्हवु नं कदीच चालनं नई .
गावमा मंग तो टिंगलना ईषय बनी गयथा . गावमा म्हनेतच ना ” बये काडी कदी लाई ते दोन दिन मल्हावाव नई ” मायन्यान कदी भो ss नुसता हाबल्या काबल्या शेत या . आख्खं गाव मंग त्यासले हाबल्या काबल्या म्हनीसनच वयखेत . कोन घर जोयजे भो ss ? हाबल्या काबल्यासना घर ? ” अशी न्यामीन परसिद्धी त्यासनी व्हयेल व्हती.
न्हानमाय त्यासनी माय व्हती . पन माय गरीब व्हती . तिनं काईच धके नई . गंज कायपात करे . तिना आंगवर आते ते मास बी नई राहेल व्हतं.जुना दांडे करेल लुगडा नेसे बिच्चारी . एव्हढी चार पाच परतननी जीमीन पन आंगवर तिना कोंताच दागिना नई व्हता . साधी भोई व्हती बिचारी.चार भाऊ ढोरेसना मायेक राबेत . एक धाकला व्हता तो सहेरमा शिकाले व्हता . न्हानमाय कडे सग्गी माय कडे दखाले त्यासले कोनले ये नई व्हती . धल्ली बी मज झुकी गयथी .
एकदा वट्टाना कोर वर बशेल व्हती . उठाले लागनी . न्हानमाय ना तोल गया का कोन जाने न्हानमाय वट्टाना खाले पडनी . एक ते उच्च वट्टानं घर व्हतं . घर फकस्त व्हवा व्हत्यात . मानशे बठ्ठा वावरेसना कामले जायेल व्हतात . न्हानमायना डोकाले जोरमा लागेल व्हतं . बिचारी बेशुद्ध व्हईसन पडनी . आजु बाजुना बाया ‘ मानसे पयतच उनात . तो धुडकम पडाना आवाज येताच एकच आऱ्हाडा उठना . आख्खा लोके तठे धावपय करत उनात . न्हान मायले उचलीसन वर वट्टा वर खाट वर टाकं . एक जन सायकल लिसन ‘ जिभोले बलाई लयनात .पयतच उनात पन उपचार करा करता गावमा एक डॉक्टर व्हतात तठे लई ग्यात.लोके म्हनेत ” अरे न्हानमायले भलतं लागेल शे . सहेरना डॉक्टर कडे लई जा . धल्लीले ऍडमिट करनं पडी . पन जिभो ऐकनारा मानुस व्हता का ? त्यानी गावना डॉक्टर कडेच लई सन मलम पट्टी कई . तरी त्या डॉक्टर म्हनेत ” सहेरमा लई जा ऍडमिट करनं पडी . पन जिभोनी हा ले हा म्हनी दिनं . घर लई उनात .
हाबल्या काबल्या म्हनेत ते काई खोट नई व्हतं . दुसरा दिन पासीन त्या गाडा जुपीसन वावरेसम्हा कामले चालना ग्यात . काम काई जिभो सोडे नई . धल्ली पड़नी बिचारी तोंड खुपसीसनी . धल्ली संग दोन सब्दे बोली लेत आनी वावरेसम्हान न्याहर्या बांधीसन निंधी जायेत. गावमा बठ्ठा म्हनेत ” अरे तुमीन असा कसा निश्शेल शेतस रे ? धल्ली ले सहेरमा मोठा हस्पिटलमा ऍडमिट कराले जोयजे . पन भाऊुसनं जिभोना मव्हरे कोनच चाले नई .
आठ धा दिन झायात . म्हतारी काई खाये नई नी पेये नई . आनी त्या काई वावरेसमा जानं सोडेत नईत . धल्ली मज खंगाई गयथी . पार खंगाई गयथी . जे व्हवानं व्हतं तेच झाये . धल्ली ले मांडी देवाले एक बी पोरगा जोडे नई व्हता . शिपा टाकाले कोनीच नई व्हतं . धल्ली नी कवय जीव सोडा त्याना पत्ताच लागना नई . धाकली व्हऊ व्हती ती मातर जोडे व्हती . मंग एकच आऱ्हाडा उठना .
धल्ली गई ‘ धल्ली गई ” वारा सारखी हाई बातमी गरमा पसरनी . तवय कोठे त्या बठ्ठा भाऊ गोया झायात . कोना डोकावर पल्ल व्हतं . कोना आंगवर चारान्या बारीक बारीक काड्या व्हत्यात . वावर म्हातलं खया म्हातलं तस्सच काम टाकी उथांत त्या . पन मातर पयतच उनात बरं का !
पन गावमा लोके म्हनेत धल्ली गयी बिचारी पन पाच भाऊुसनी जोड . पाच पोरे बिचारी पन पाच भाऊसनी जोड . पाच पोरे धल्लीना काय उपयोग ? एक बोय धल्ली म्हतारी काठी टेकीसन उभी व्हती . थरथरता आवाजमा ती बोलनीच ” वं माय वं काय उप्योग झाया ‘ … म्हंतस ना ..!” बारासनी माय नी खाटलावर जीव जाय ” . तसच आनं उनंना . काय करतस माय .. ? ” आख्ख गाव नावे ठेवेत ना ” हाबल्या काबल्यासन्या कचाटा म्हाईन सुटनी एकदानी बिचारी . पन काय उप्योग ? ” बारासनी माय … ?