सातव अहिराणी संमेलन
कविता
अशी कसी मामा तुमनी पोर
जीवले सेना तो भलताच घोर
जसा तो थुईथुई नाचस मोर
तशी नाचाडस माले मोहर!धृ!
उठाले वहतस इले आकरा
न्याहरीले मांगस हाई खाकरा
नखरा सेतस ना ईना सतरा
बनाडी टाका ना माले बकरा
तुमीच सांगा ना मामा मी ईले
कसा लाऊ तो नाथदोर! 1!
मामा कसा हाऊ दारूले पेस
छटटाना आकडा रोज लावस
गावमा उपादया करत फिरस
घरमा ईसनी तो माले मारस
तुमीच सांगा बाबा मी येना
कसा करू ना तो संवसार!2!
जरी नी चोळी पैठनी साळी
सोना चांदीनी भलती गोडी
तोंडमा पान नी होटले लाली
फिराले मांगस मोटरगाडी
मावठी पतरन नको ना ईले
पाहीजे ना बंगलान ते घर!3!
साळी चोळी नही मी आळी
सोन चांदी टाक सगळ मोळी
काय काय सांगू येनी मी खोडी
फुकट मा लावसना लाडीगोडी
नवरा मना तो आत्याना पो-या
म्हणीसनी सेना मनी माघार!4!
माय बापन हाई ऐकस नही
सासु सासराना तो धाक नही
मनत विचारू नका ना मामा
वाटीसनी माले हाई खाई गयी
मुडनी खोड नी करसु ना गोड
शेवटी से मना मामानी पोर!5!
कवी /गीतकार
डॉ दत्ता ठाकरे वावडेकर
कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन